Tuesday, December 30, 2008

नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा!

मित्रांनो,

नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा! छान रहा. हसत रहा. मी हे एक ग्रीटींग कार्ड बनवले आहे तुमच्यासाठी. मी फक्त फोटो आणि शब्द एकत्र आणलेत. फोटो आणि शब्द जरी माझे नसले तरी भावना माझ्याच आहेत.

केदार

Saturday, December 6, 2008

असचं वाटलं म्हणुन|

मित्रांनो,

मी खरतरं चारोळी वगैरे करत नाही. पण अचानक ही काल सुचली. इथे देत आहे.

उजेडापेक्षा अंधारातच मला जास्त बरं वाटतं
लपवून ठेवलेलं पाणी तिथे सहज डोळ्यात साठतं
मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो
काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो

केदार

Monday, November 24, 2008

हे विश्वची माझे घरं!

आज काही फोटोज् अपलोड करतोय. यातले काही, मी रहातो त्या DSK विश्व मधले, तर काही अजून कुठले, जिथे कळत-नकळत माझं विश्व निर्माण झालं! 'हे विश्वची माझे घरं' हे त्या अर्थानी समर्पक शीर्षक आहे असं मला वाटतं.


सूर्याची पिल्लं


घरातून दिसणारा सूर्यास्त


बागेतला जास्वंद


City view @ DSK विश्व


सज्जनगड


तोक्यो DisneyLand


नोगावा कोएन (अर्थात 'नोगावा' नावाची बाग)


तोक्यो (near emperor palace)


ईनोकाशिरा पार्क (किचिजोजी) साकुरा