नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा! छान रहा. हसत रहा. मी हे एक ग्रीटींग कार्ड बनवले आहे तुमच्यासाठी. मी फक्त फोटो आणि शब्द एकत्र आणलेत. फोटो आणि शब्द जरी माझे नसले तरी भावना माझ्याच आहेत.
मी खरतरं चारोळी वगैरे करत नाही. पण अचानक ही काल सुचली. इथे देत आहे.
उजेडापेक्षा अंधारातच मला जास्त बरं वाटतं लपवून ठेवलेलं पाणी तिथे सहज डोळ्यात साठतं मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो